बातम्या
"महात्मा गांधींच्या विचारांची आजही देशाला गरज - ॲड. धनंजय पठाडे"
By nisha patil - 1/30/2025 7:28:27 PM
Share This News:
"महात्मा गांधींच्या विचारांची आजही देशाला गरज - ॲड. धनंजय पठाडे"
कोल्हापूर, दि. ३० (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींनी देशातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली, असे ॲड. धनंजय पठाडे यांनी महात्मा गांधी पुण्यतिथी प्रसंगी व्यक्त केले.
पापाची तिकटी येथे उभारण्यात आलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. १९५१ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
"महात्मा गांधींच्या विचारांची आजही देशाला गरज - ॲड. धनंजय पठाडे"
|