बातम्या

जीबी सिंड्रोमचा कहर! पुण्यात दोन महिलांचा मृत्यू

The havoc of GB syndrome


By nisha patil - 1/31/2025 7:48:10 PM
Share This News:



जीबी सिंड्रोमचा कहर! पुण्यात दोन महिलांचा मृत्यू

 राज्यात जीबी सिंड्रोमने चार बळी, प्रशासन सतर्क

पुण्यात जीबी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने आणखी दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधील ३६ वर्षीय महिला आणि पुण्यातील नांदेड गावातील ६० वर्षीय महिलेला या आजाराचा फटका बसला. ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
राज्यात या आजाराने आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.


जीबी सिंड्रोमचा कहर! पुण्यात दोन महिलांचा मृत्यू
Total Views: 44