बातम्या
मुलासाठी विकृतीचा कळस! बलात्काराची अमानुष किंमत
By nisha patil - 3/15/2025 3:19:20 PM
Share This News:
मुलासाठी विकृतीचा कळस! बलात्काराची अमानुष किंमत
मातृत्वाची अमानवी किंमत! मोलकरणीला बलात्काराचा भयंकर फटका
गोरखपूरच्या शाहपूर भागात घडलेल्या एका थरारक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेने संपूर्ण समाज हादरला आहे. मातृत्वासाठी आसुसलेल्या एका दाम्पत्याने क्रूरतेचा कळस गाठत, आपल्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला बलात्काराच्या अमानवी किंमतीची शिक्षा भोगायला लावली.
सात वर्षांपासून मूल न झालेल्या ब्रिजपाल सिंह आणि सोनिया सिंह या पती-पत्नीने स्वतःच्या नवऱ्याला मूल देण्यासाठी एका निरपराध महिलेचे शोषण करण्याचा विकृत डाव आखला. "जर तू माझ्या नवऱ्याचे मूल जन्माला घालशील, तर तुला जमीन आणि फ्लॅट देऊ," असे आमिष दाखवत त्यांनी २५ वर्षीय मोलकरणीला पाशवी तडजोडीवर भाग पाडण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा परिस्थिती भयावह वळणावर गेली.
सोनियाने थेट चाकू तिच्या गळ्यावर ठेवत पतीकडून बलात्कार करवून घेतला! इतकेच नव्हे, तर त्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून त्याचा वापर पीडितेला शारीरिक आणि मानसिक छळासाठी केला. अखेर संधी मिळताच पीडितेने पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि या भयंकर कृत्याचा पर्दाफाश केला.
आरोपी ब्रिजपाल आणि सोनिया दोघेही सध्या फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. त्यांच्या अटकेसाठी प्रत्येकी १०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
या घटनेने समाजातील विकृत मानसिकतेचे आणखी एक रूप आपल्या सर्वांसमोर आले आहे.
मुलासाठी विकृतीचा कळस! बलात्काराची अमानुष किंमत
|