बातम्या
बँडबाजा - वऱ्हाड घेऊन पोहोचला नवरा.. पण वधू आणि तिचे घरही गायब
By nisha patil - 1/30/2025 7:37:54 PM
Share This News:
बँडबाजा - वऱ्हाड घेऊन पोहोचला नवरा.. पण वधू आणि तिचे घरही गायब
कुठे घडली घटना पहा ; धक्कादायक प्रकार आला समोर
हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यात मंगळवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका नवऱ्याने वऱ्हाड, बँडबाजा घेऊन नवरीच्या गावी पोहोचल्यावर त्याला तिथे न नवरी दिसली, न तिचं घर दिसलं. त्याने लग्न जुळवणाऱ्या महिलेने फोटो दाखवून आणि बोलणी करून लग्न ठरवले होते. पैसे घेतल्यावर नवरा आणि त्याचे वऱ्हाडी गावी पोहोचले, पण वधूपक्ष कुठेच दिसला नाही.
नवरदेवाने लग्न जुळवणाऱ्या महिलेला फोन केला, पण ती उडवाउडवीची उत्तरे देत राहिली. अखेर हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. ९० ते १०० वऱ्हाड्यांसमोर झालेल्या या प्रकारामुळे नवऱ्या मुलाच्या कुटुंबावर मोठा धक्का बसला आहे. पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
बँडबाजा - वऱ्हाड घेऊन पोहोचला नवरा.. पण वधू आणि तिचे घरही गायब
|