विशेष बातम्या
ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
By nisha patil - 3/31/2025 2:56:09 PM
Share This News:
ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
कागल आगारात ५ नवीन एस.टी. बसगाड्यांचे लोकार्पण
प्रवाशांसाठी अधिक आरामदायी आणि सोयीस्कर सेवा उपलब्ध
कागल आगार मध्ये 5 नवीन आरामदायी एस.टी. बसचे लोकार्पण तसेच 5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कागल बस स्थानकाचा शुभारंभ ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून प्रवाशांच्या सेवेसाठी आज एकूण 5 नवीन आरामदायी एस.टी. बसगाड्या दाखल झाल्या. या बस सेवेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ना. मुश्रीफ म्हणाले, या नवीन बसगाड्यांमुळे कागल तालुक्यातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. तसेच नवीन बस स्थानक हे अत्याधुनिक व उत्कृष्ट दर्जाचे होईल
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, विभाग नियंत्रक जाधव, शहराध्यक्ष संजय चितारी, माजी नगरसेवक चंद्रकांत गवळी, डेपो मॅनेजर, अधिकारी व कर्मचारी व यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
|