विशेष बातम्या
वारणा नदी प्रदूषणाचा मुद्दा गंभीर...
By nisha patil - 2/27/2025 2:55:28 PM
Share This News:
वारणा नदी प्रदूषणाचा मुद्दा गंभीर...
बाजीराव पाटील यांची कारवाईची मागणी
वारणा नदीमध्ये प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते बाजीराव पाटील उर्फ नाना यांनी केली आहे. वारणा नदीच्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर ते आक्रमक होत कांदे गावातील रामेश्वर मंदिराजवळील ओढ्यात मिसळणाऱ्या मळीमिश्रित पाण्याची पाहणी केली.
यावेळी सांगली प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार, क्षेत्र अधिकारी सचिन हरभट आणि विश्वास कारखान्याचे पर्यावरण केमिस्ट शरद पाटील हे उपस्थित होते. नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याचे नमुने घेतले गेले असून, या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि बाजीराव पाटील (नाना) यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडवत नदीच्या आरोग्यास धोका पोहोचवणाऱ्या कारखान्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी यावर त्वरित लक्ष देत वारणा नदीत मळीमिश्रित पाणी मिसळणार नाही याची दखल घेतली जाईल, असा शब्द दिला.
वारणा नदी प्रदूषणाचा मुद्दा गंभीर...
|