विशेष बातम्या
ड्रग्स तस्करी वाढीचा मुद्दा विधान परिषदेत...
By nisha patil - 7/3/2025 10:59:07 PM
Share This News:
ड्रग्स तस्करी वाढीचा मुद्दा विधान परिषदेत...
अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाईची मागणी – सतेज पाटील
कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याने शेकडो तरुणांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. याबाबत कोणती कारवाई केली जाते, तसेच तरुणांना व्यसनापासून रोखण्यासाठी उपाययोजना काय, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 2024 मध्ये 15,873 गुन्हे दाखल झाले असून 14,230 अटक केल्याची माहिती दिली.
ड्रग्स तस्करी वाढीचा मुद्दा विधान परिषदेत...
|