मनोरंजन

लोकोद्धाराची जोड देऊन विश्वकल्याण साधणाऱ्या मुक्ताईचा जीवन प्रवास 

The life journey of Muktai


By nisha patil - 3/28/2025 10:41:08 PM
Share This News:



लोकोद्धाराची जोड देऊन विश्वकल्याण साधणाऱ्या मुक्ताईचा जीवन प्रवास 

संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई 18 एप्रिल पासून चित्रपटगृहात

तेराव्या शतकातील सामाजिक छळवादाने होरपळून निघालेल्या विठ्ठल पंतांच्या पोटी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या विभूती जन्माला आल्या. वैयक्तिक आत्मोद्धाराला लोकोद्धधाराची जोड देऊन आत्मकल्याण व विश्वकल्याण साधणाऱ्या मुक्ताई यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारा "संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई" हा चित्रपट 18 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

देह रुपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या स्त्री-पुरुष भेदापलीकडे जगणे शिकवणाऱ्या संत मुक्ताईंचा खडतर आणि भक्तीरसाने परिपूर्ण जीवन प्रवास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा यासाठी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा वेगळा प्रयत्न केल्याची माहिती आज दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या चित्रपटाची निर्मिती रमेश कुंदन थंडानी यांनी केली आहे.चित्रपटात संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे दिसणार असून संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक हिने साकारली आहे. याचबरोबर अक्षय केळकर यांनी संत निवृत्तीनाथांची तर सुरज पारसनीस यांनी सोपानकाकांची भूमिका केली केलीये. यासोबत समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी,योगेश सोमण,स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, आदिनाथ कोठारे यांच्या सुद्धा चित्रपटात भूमिका आहेत.


लोकोद्धाराची जोड देऊन विश्वकल्याण साधणाऱ्या मुक्ताईचा जीवन प्रवास 
Total Views: 18