बातम्या

मुख्य आरोपी रवींद्र पडवळ, बंडा साळोखे अजूनही फरार,

The main accused Ravindra Padwal


By nisha patil - 7/18/2024 6:31:09 PM
Share This News:



विशाळगड हिंसाचारानंतर मुख्य आरोपींच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. पुण्यातील हिंदू बांधव समितीचे अध्यक्ष रवींद्र पडवळ आणि कोल्हापुरातील बंडा साळोखे यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. 14 जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर दोघेही फरार झाले आहेत. पडवळने केलेल्या आवाहनानंतर विशाळगड पायथ्याला पोहोचलेल्या शेकडो तरुणांनी तोडफोड करून दहशत माजवली होती. जमावाला पेटवणारे   पडवळ यांच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांची पथके पुण्याला रवाना झाली आहेत. दंगलीसाठी कारणीभूत ठरलेले पडवळ यांच्यासह दंगलखोरांवर पोलिसांनी दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत. संशयितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. 
            विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी हाक दिलेल्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती समर्थकांसह विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचण्यापूर्वीच हिंदू बांधव समिती आणि सेवाव्रत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गडाच्या पायथ्याला प्रचंड तोडफोड केली होती. जमावबंदी लागू असल्याने आंदोलन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्याकडे दुर्लक्ष करून तोडफोड करण्यात आली होती. दुसरीकडे, कोल्हापुरातील सेवाव्रत संघटनेचे बंडा साळोखे यांनी शनिवारी रात्री सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल करून कार्यकर्त्यांना गडावर येण्याचे आवाहन केले होते. त्यांनीच गडावरील आणि पायथ्याच्या तोडफोडीसाठी प्रवृत्त  केल्याचे काही व्हिडितून समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी पडवळ आणि साळोखे यांच्यावर दंगलीला कारणीभूत ठरल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय प्रत्यक्ष घरांची तोडफोड करणा-यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत


मुख्य आरोपी रवींद्र पडवळ, बंडा साळोखे अजूनही फरार,