बातम्या
आत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’कडे नेणारा अर्थसंकल्प
By nisha patil - 2/23/2025 9:47:29 PM
Share This News:
आत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’कडे नेणारा अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे. नागरिकांची बचत वाढवून त्यांना देशविकासाचे भागीदार बनविण्यासाठी या अर्थसंकल्पात ठोस तरतुदी करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या तरतुदी:
🔹 शेतकरी व अन्नदाते सशक्त करण्यासाठी:
- पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना
- खाद्यतेल आत्मनिर्भरतेसाठी सहा वर्षांची विशेष मोहीम
- युरिया आत्मनिर्भरता योजना
🔹 शिक्षण आणि युवा विकासासाठी:
- पाच ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’ ची स्थापना
- सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी
- ५०,००० अटल टिंकरिंग लॅब्स
🔹 मध्यमवर्गीयांना दिलासा:
- ₹१२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त
- वरिष्ठ नागरिकांच्या बँक व्याजावर TDS मर्यादा ₹१ लाख
- घरभाड्यावर TDS मर्यादा ₹६ लाख
🔹 पायाभूत सुविधा व MSME क्षेत्रासाठी:
- स्टार्टअप्स, रोजगारनिर्मिती, निर्यात क्षेत्राला चालना
- लघु व मध्यम उद्योगांसाठी विशेष तरतुदी
🔹 सामाजिक कल्याणासाठी:
- जन आरोग्य योजना आणि सक्षम आंगणवाडी
- गिग वर्कर्स कल्याण योजना
- जलजीवन मिशन
हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल असून, गरिबांपासून मध्यमवर्ग आणि उद्योजकांपर्यंत प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा निर्धार यात आहे, असे खासदार महाडिक यांनी नमूद केले.
आत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’कडे नेणारा अर्थसंकल्प
|