बातम्या

चंद्रकांतदादा पाटील व उद्धव ठाकरे यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधान...

The meeting of Chandrakantada Patil and Uddhav Thackeray sparked political discussions


By nisha patil - 6/27/2024 2:46:30 PM
Share This News:



भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अनिल परब आणि अंबादास दानवे हे नेते देखील उपस्थित होते.चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिलं. तर अनिल परब यांना पेढा भरवत शुभेच्छाही दिल्या. तुम्हाला निकालाच्या आधीच शुभेच्छा देतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तर उद्या तुम्ही चॉकलेट देणारच आहात, असं उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांना म्हणाले. विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले असतानाच, पाटील आणि ठाकरे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे


चंद्रकांतदादा पाटील व उद्धव ठाकरे यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधान...