बातम्या
काळम्मावाडी धरण परिसरात वाहून गेलेल्या दोन युवकांचे बेपत्ता मृतदेह सापडले.
By nisha patil - 2/7/2024 1:52:00 PM
Share This News:
काळाम्मावाडी धरण पाहण्यासाठी आलेल्या निपाणीचे दोन युवक धरण परिसरातील दूधगंगा नदी कालव्यात बुडाल्याची घटना सोमवारी घडली होती. या दुर्घटनेतील बेपत्ता प्रतीक पाटील व गणेश कदम या दोन्ही युवकांचा मृतदेह शोधण्यास आज सकाळी NDRF व KDRF च्या टीमला यश आलय.
काळम्मावाडी धरण पाहण्यासाठी निपाणी येथील 13 युवक सोमवारी सकाळी आले होते.यापैकी प्रतीक पाटील व गणेश कदम हे दोन युवकधरणा शेजारील दूधगंगा नदी कालव्यात पाय घसरून बुडाले.घटनेची माहिती समजताच राधानगरी पोलीस, NDRF व KDRF च्या टीम ने रेस्क्यू कार्य सुरू केले.मात्र सोमवारी सकाळपासूनच पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कालव्या मध्ये पाण्याची पातळी वाढत गेली.यामुळे शोध मोहिमेस अडथळे येऊ लागले.आज सकाळपासून शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. दुपारी साडे अकराच्या दरम्यान दोन्ही युवकांचे मृतदेह शोधण्यास रेस्क्यू टीमला यश आल.अशी माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली.
काळामवाडी धरण परिसरात अशा घटना वारंवार घडत आहेत.गेल्याच महिन्यात इचलकरंजी येथील दोघाजणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.त्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी काळजी बाळगण्यासह तरुणाईची हुल्लडबाजी रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावल उचलण्याची गरज आहे.
काळम्मावाडी धरण परिसरात वाहून गेलेल्या दोन युवकांचे बेपत्ता मृतदेह सापडले.
|