विशेष बातम्या
राज्यकर्ते षंढ... राजू शेट्टींचा संताप
By nisha patil - 7/4/2025 4:07:47 PM
Share This News:
राज्यकर्ते षंढ... राजू शेट्टींचा संताप
कॉ. गिरीष फोडेंचे निलंबन.. राजकीय दबावापोटी : राजू शेट्टी
शक्तीपीठ घोटाळ्यावरून राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात
सरकारविरोधात वक्तव्य केल्याच्या कारणावरून कॉम्रेड गिरीष फोडे यांना सहाय्यक शिक्षक पदावरून तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचा आरोप महापालिका प्रशासनावर करण्यात आला आहे. यामागे राजकीय दबाव असून, टक्केवारीवर जगणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.
राज्यकर्ते षंढ झाले असून, त्यांनी चळवळी संपवण्यासाठी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांनी तीव्र शब्दांत सरकारवर टीका केली.
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पातून किमान ५० हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा डाव असून, हे कारनामे जनतेपासून लपवता येणार नाहीत. सत्तेचा अतिरेक करणाऱ्या नेत्यांना जनता योग्य वेळी रस्त्यावर उतरून उत्तर देईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
राज्यकर्ते षंढ... राजू शेट्टींचा संताप
|