बातम्या
मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत ठाकरे-भाजप युतीची शक्यता वाढली
By nisha patil - 11/1/2025 2:47:17 PM
Share This News:
मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत ठाकरे-भाजप युतीची शक्यता वाढली
फडणवीस-आदित्य ठाकरे भेटीनंतर राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या शक्यतेने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत मुंबईतील विविध समस्या आणि विकासकामांवर चर्चा झाली असल्याचे सांगितले जात असले तरी, या भेटीनंतर भाजप-ठाकरे युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
एकीकडे शिंदे गटात सोबत नाराजीचा सूर कायम असतानाच फडणवीस हे ठाकरे गटासोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे आमचे शत्रू नाहीत, असे वक्तव्य करून संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरेंनीही भविष्याबाबत अनिश्चितता दर्शवित सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे.
मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत ठाकरे-भाजप युतीची शक्यता वाढली
|