बातम्या

टोमॅटोचा भाव घसरला...

The price of tomato fell


By nisha patil - 3/8/2024 2:33:22 PM
Share This News:



टोमॅटोचा भाव घसरला... 

इतर भाज्या झाल्या महाग 
             
आभाळाला लागलेला टोमॅटोचा भाव अखेर घसरला.सर्वसामान्यांच्या आहारात  टोमॅटो परत आला आहे. दोन महिन्यानंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या नाश्त्यासह जेवणात टोमॅटो परत आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोचा भाव वाधल्याने ग्राहकांनी खरेदी कमी केली होती. आता किंमती अर्ध्यावर आल्या आहेत.टोमॅटोने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. दोन महिन्यापासून टोमॅटोचा भावाने शंभरी गाठली होती. 
             

तर उत्तर भारतात टोमॅटोचा आलेख गेल्यावर्षीप्रमाणे वाढत होता. पण केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप केला. तर राज्यात टोमॅटोचे उत्पादन वाढले. त्यांची आवक वाढली. मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात आल्याने मुंबईसह राज्यातील अनेक भागात टोमॅटोचा दर अर्ध्यांहून खाली आला. पण इतर काही भाज्या महागच असल्याचा ग्राहकांचा सूर आहे.                                                                                    
         

श्रावण महिना सुरु होत आहे. 5 ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक केवळ शाकाहारच करतात. आता टोमॅटो आणि इतर काही भाज्यांचे दर घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. टोमॅटोचा भाव काही भागात 100 तर काही ठिकाणी 80 रुपये होता. आता या किंमती 40 ते 48 रुपये प्रति किलोवर आल्या आहेत. आता श्रावण महिन्यात भाजीपाल्याला मोठी मागणी असणार आहे. टोमॅटोच्या किंमती कमी झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.


टोमॅटोचा भाव घसरला...
Total Views: 34