विशेष बातम्या
राधानगरी तालुक्यातील धामोड येथे पुन्हा एकदा भानामतीचा प्रकार.
By nisha patil - 6/3/2025 7:24:07 PM
Share This News:
राधानगरी तालुक्यातील धामोड येथे पुन्हा एकदा भानामतीचा प्रकार.
राधानगरी तालुक्यातील धामोड येथे भानामतीचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. आज सकाळी गावातील नागरिक गावच्या स्मशान भूमीमध्ये गेले होते.यावेळी त्यांना तिथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हा अघोरी प्रकार केल्याचं निदर्शनास आलं. या ठिकाणी हळदी कुंकवाने माखलेला कोहळा,लिंबू, काळ्या बाहुल्या, अंडी आणि त्याच्यावर कुंकवाचे थर असा जादूटोण्याचा आघोरी प्रकार केल्याचा समोर आलाय.या प्रकारामुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालंय. या परिसरामध्ये वारंवार असे प्रकार घडत असून संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होती आहे.
राधानगरी तालुक्यातील धामोड येथे पुन्हा एकदा भानामतीचा प्रकार.
|