विशेष बातम्या
तिरवडे कुडतरवाडी दरम्यान असलेल्या नर्सरीतील झाडे तीन चार किलोमीटर अंतरावरील जळून भस्मसात.
By nisha patil - 3/3/2025 2:35:43 PM
Share This News:
तिरवडे कुडतरवाडी दरम्यान असलेल्या नर्सरीतील झाडे तीन चार किलोमीटर अंतरावरील जळून भस्मसात.
कोल्हापूर जिल्ह्यामधील भुदरगड तालुक्यातील वनपरिक्षेत्र कडगाव हद्दीतील कुडतरवाडी ,तिरवडे दरम्यान असलेल्या नर्सरी चार किलोमीटर अंतरावरील अनेक झाडांचे खूप प्रमाणात नुकसान झाले असून याकडे जंगल विभागाने दुर्लक्ष का केले. असा सवाल जनतेतून होत आहे. वनवा सप्ताह जनजागृती उपक्रमाचे आयोजन करून . झाडे वाचवा हा संदेश अनेक गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच. सदस्य यांना देण्यात आला होता. वन कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नर्सरीची खूप मोठे नुकसान झाले आहे . कुंपणानं जर शेत खाल्ले तर न्याय मागायचा कुणाकडे .
हसा सवाल जनतेतून होत आहे. मग लाखो रुपये खर्च करून नर्सरी लावून त्याचा काय? उपयोग. वन अधिकारी डोळे झाकून गप्प का आहे? त्यांचा या प्रकरणाची काही गोड बंगाल आहे. की काय असा सवाल जनतेतून होत आहे. अनेक गावांमध्ये वन्यजीव शेतामध्ये येऊन पिकांचे नुकसान करतात . पण रात्रीच्या वेळी वनरक्षक घरी निवांत झोपलेले असतात. शासनाच्या नियमानुसार वनरक्षकांनी नेमून दिलेल्या आपल्या बीटामध्ये राहायचं असतं. पण कोणीच राहत नाही? नर्सरी ला आग लागून लाखो रुपयाची नुकसान झाले त्यावेळी कर्मचारी घरी निवांत झोपले होते त्यामुळे एवढे मोठे नुकसान झालेले आहे. अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे .
त्यामुळे वन्यजीव शिवारात वनरक्षक घरात. असा सवाल जनतेतून होत आहे. शासनाच्या नियमानुसार जर दोन किलोमीटरच्या वरती अंतर जळाले असेल . तर पंचनामा करून पुरावे सादर करावयाच्या असतात. पण असं अधिकाऱ्यांनी केलं का? आणि केलं असेल असेल तर ते कोणत्या पद्धतीने केले. यांची चौकशी होणे गरजेचे आहे.
याचा जाब वनपाल यांना विचारला असता . नेमून दिलेल्या बिटातमध्ये आम्ही काहीही करू आमचं कुणीही वाकड करू शकत अशी नाही . अशी लोकांना उडवा उडवीची उत्तरे देतात .याचा निषेध म्हणून अशा हलगर्जी वनाधिकाऱ्यांच्या विरोध कठोर कारवाईची मागणी जनतेतून होत आहे . असे न झाल्य तीव्र आंदोलनाचा इशारा जंगल प्रेमी व जनतेने दिलेला आहे.
तिरवडे कुडतरवाडी दरम्यान असलेल्या नर्सरीतील झाडे तीन चार किलोमीटर अंतरावरील जळून भस्मसात.
|