बातम्या

पीएम किसान योजनेत झालाय ‘हा’ मोठा बदल....

This is a big change in PM Kisan Yojana


By nisha patil - 1/28/2025 2:59:21 PM
Share This News:



 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांना नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन केल्यास योजनेचा लाभ घेता येणार आहे. या नियमांनुसार, शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक लिंक करणे व शेतकरी ओळख क्रमांक घेणे अनिवार्य असेल.

तर १९वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी वितरीत होणार असून, यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक नाही. २०वा हप्त्यापासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती-पत्नी व १८ वर्षांखालील कुटुंबातील सदस्यांचे आधार क्रमांक जोडणे आवश्यक करण्यात आले आहे.

सीएससी केंद्रावर जाऊन शेतकरी ओळख क्रमांक मिळवू शकतात. त्याचबरोबर जमिनीच्या नोंदी नसलेल्या ७८ हजार शेतकऱ्यांना केवायसी लिकिंग न झालेल्या लाभार्थ्याना हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात.


पीएम किसान योजनेत झालाय ‘हा’ मोठा बदल....
Total Views: 65