बातम्या
हा रस्ता आयडियल रोड म्हणून विकसित केला जाईल : आ. अमल महाडिक
By nisha patil - 6/1/2025 10:22:53 PM
Share This News:
देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर पर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालीय. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आणि रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. आज आ.अमल महाडिक यांनी रस्त्याची पाहणी केली. हा रस्ता विकसित करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर पर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालीय. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आणि रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. आज आ.अमल महाडिक यांनी रस्त्याची पाहणी केली. हा रस्ता आयडियल रोड म्हणून विकसित केला जाईल अस वक्तव्य आ.अमल महाडिकांनी केलं. तपोवन मैदान परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या रस्त्यावरून जाताना नागरिकांना आल्हाददायक वाटेल असा रस्ता विकसित केला जाईल अशी ग्वाही आ.अमल महाडिकांनी याप्रसंगी दिलीय. तसेच रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ, बसण्यासाठी बेंच तसेच सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटर्स अशा पद्धतीने हा रस्ता विकसित करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, विनय खोपडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते
हा रस्ता आयडियल रोड म्हणून विकसित केला जाईल : आ. अमल महाडिक
|