बातम्या
याही वर्षी नवरात्रीत 'शाही दसरा महोत्सवातून' विविध कार्यक्रमांचे आयोजन
By nisha patil - 9/20/2024 10:09:46 PM
Share This News:
या वर्षीचा नवरात्रोत्सव दि. 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने गुरूवारी सायंकाळी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्रोत्सवात चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश संबंधित सर्व विभागांना दिले.
ते म्हणाले, भाविकांना चांगल्या पध्दतीने दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करा, स्वच्छता विषयक कामांना सुरुवात करा, सालाबादप्रमाणे ठिकठिकाणी वाहनतळ उभारुन दिशादर्शक फलक लावा, पोलीस प्रशासन आणि मंदिर समिती यांनी समन्वयातून सुरक्षाविषयक नियोजन करा, गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना राबवा तसेच भाविकांना चांगल्या प्रकारे आरोग्य विषयक सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
बैठकीला अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, प्रांताधिकारी हरिष धार्मिक, अति. महापालिका आयुक्त राहुल रोकडे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, पोलीस उपअधिक्षक अजित टिके, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, तहसिलदार स्वप्निल रावडे, जिल्हा पर्यटन समिती सदस्य आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.
याही वर्षी नवरात्रीत 'शाही दसरा महोत्सवातून' विविध कार्यक्रमांचे आयोजन
|