बातम्या

इंद्रजीत सावंत यांना धमकी .. इंडिया आघाडीची निदर्शने 

Threat to Indrajit Sawant


By nisha patil - 2/27/2025 2:56:56 PM
Share This News:



इंद्रजीत सावंत यांना धमकी .. इंडिया आघाडीची निदर्शने 

पेशवे सरकारचा धिक्कार असो च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

प्रशांत कोरटकरवरला सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप 

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी प्रशांत कोरटकर याला अटक करावी. सरकारने त्याला पाठीशी न घालता कडक कारवाई करावी अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. आज इंद्रजीत सावंत यांना दिलेल्या धमकीप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येत्या पाच तारखेपर्यंत प्रशांत कोरटकर ला अटक झाली नाही तर मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात रस्त्यात आडवं असा इशारा आंदोलकांनी दिला.


आंदोलनात खासदार शाहू महाराज, शिवसेना ठाकरे गट सह संपर्कप्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, सचिन चव्हाण, भारती पाटील, यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, शिव शाहू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इंद्रजीत सावंत यांना धमकी .. इंडिया आघाडीची निदर्शने 
Total Views: 46