बातम्या

तीन फुटाचा खड्डा अन् नरबळी ; कोल्हापुरात गुप्तधनासाठी अघोरी कांड...

Three feet pit and human sacrifice


By nisha patil - 3/7/2024 1:24:20 PM
Share This News:



अंधश्रध्देतून जादूटोणा अघोरी विद्या केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच एक प्रकार राधानगरी तालूक्यातील कौलव  येथे समोर आला आहे. या प्रकरणाने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.काही दिवसापूर्वी गावात गूप्तधन काङले जाणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सूरू होती. काल मंगळवारी  गावातील हरिजन वसातीजवळ   शरद धर्मा माने यांचे घर आहे. या घरामध्ये बाहेरील गावचे  पाच ते सहा लोक आले होते.पण गावातील लोकांनी याकङे फारसे लक्ष दिले नव्हते. पण या गावचे सरपंच रामचंद्र सदाशिव कूंभार यानां याबाबत शंका वाटू लागली.

त्यामूळे त्यांनी उपसरपंच अजित पाटील""ग्रामपंचायत सदस्य  प्रकाश कांबळे " संदीप चरापले" पोलिस पाटील  बी. एस. कांबळे यानां बोलावून घेतले. आणी सर्वजण  हरिजन वसाहतीमध्ये असलेल्या  शरद धर्मा माने यांच्या घरी  सायंकाळी  7 वाजण्याच्या सूमारास गेले असता  तेथे एका चटईवर केळीच्या पानावरती हळद"" कूंकू सूपारी" नारळ"पानाचे विङे लिंबू त्याला टाचण्या मारलेली अशी पूजा करत असल्याचे दिसले. त्यातील चंद्रकांत महादेव धूमाळ हा मंत्रोउच्चार करत असल्याचे दिसले.त्याच्या गळ्यामध्ये रूद्राक्षाच्या व  वेगवेगळ्या माळा घातलेल्या होत्या.त्याच्या शेजारी शरद धर्मा माने बसलेला दिसून आला.  ते पाहता ते कूत्य अनिष्ठ व आघोरी प्रथा व जादूटोणा असल्याचे लक्षात आल्यानंतर सरपंच 'ग्रामपंचायतीचे सदस्य" पोलिस पाटील हे   आतील खोलित गेले असता तेथे देवघराच्या समोर अंदाजे तीन ते चार फूटाचा खङ्ङा काढला होता. खङ्ङ्याची उकरलेली माती पङलेली दिसली म्हणून उपसरपंच अजित राजाराम पाटील यांनी त्या लोकानां जाब विचारला की ही कसली पूजा आहे. त्यावर संतोष निवूत्ती लोहार राहाणार. वाझोली तालूका. पाटण. जिल्हा सातारा यांने सांगितले की या खङ्ङ्यामध्ये गूप्तधन मिळणार आहे. त्यासाठी ही पूजा करत असल्याचे सांगितले. व तेथील अशिष रमेश चव्हाण राहाणार मंगळवार पेठ कराङ जिल्हा सातारा यांने सरपंच ""पोलिस पाटील" आणी ग्रामपंचायत सदस्यानां सांगितले की तूम्ही येथून निघून जावा अन्यथा तूम्हाला ठार मारीन अशी धमकी दिल्याने अजित राजाराम पाटील यांनी या 6 जणांविरोधात राधानगरी पोलिसांत तक्रार  दिली आहे. याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी शरद  धर्मा माने राहाणार. कौलव.तालूका.राधानगरी"""""
 

महेश सदाशिव माने राहाणार. राजमाची. तालूका .कराङ. जिल्हा. सातारा.""""अशिष रमेश चव्हाण राहाणार मंगळवार पेठ कराङ. जिल्हा.सातारा""""चंद्रकांत महादेव  धूमाळ राहाणार मंगळवार पेठ कराङ. जिल्हा. सातारा. संतोष निवूत्ती लोहार राहाणार वाझोली.तालूका पाटण.जिल्हा सातारा.""कूष्णात बापू पाटील. राहणार पूलाची शिरोली.तालूका. हातकणंगले.  यानां राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा तपास राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काँ. जठार करत आहेत.


तीन फुटाचा खड्डा अन् नरबळी ; कोल्हापुरात गुप्तधनासाठी अघोरी कांड...