बातम्या

तिघा मोटरसायकल चोरट्यांना अटक.

Three motorcycle thieves arrested


By nisha patil - 7/4/2025 4:06:43 PM
Share This News:



तिघा मोटरसायकल चोरट्यांना अटक.

सुमारे 8 लाखांच्या 14 मोटारसायकली जप्त

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तिघां मोटारसायकल चोरट्यांना अटक केलीय. त्यांच्याकडून सुमारे 8 लाख रुपये किमतीच्या 14 मोटारसायकली जप्त केल्यात. या प्रकरणी अक्षय राजू शेलार, विनायक बाळू गवळी, आणि चंद्रदिप कुलदिप गाडेकर या कागल येथील तिघांना अटक केलीय. आरोपींनी इंचलकरंजी,कागल, गोकुळशिरगांव ,इस्पुर्ली,कबनूर ,कुंरुदवाड ,निपाणी  कर्नाटक येथून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिलीय.पोलिसानी त्यांच्या कडील मोटारसायकली जप्त करून मोटारसायकल चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आणलेत.या तिघांना पुढ़ील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.

ही कारवाई पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलिस सागर चौगुले,युवराज पाटील,राजू कांबळे,समीर कांबळे,अशोक पोवार,सतीश जंगम,विलास किरोळकर,अमित सर्जे,नामदेव यादव ,यशवंत कुंभार ,कृष्णात पिंगळे आणि विनायक बाबर यांनी केली.


तिघा मोटरसायकल चोरट्यांना अटक.
Total Views: 18