बातम्या

गांधीनगरमध्ये तरुणाचा थरारक खून

Thrilling murder of youth in Gandhinagar


By nisha patil - 11/1/2025 2:45:48 PM
Share This News:



गांधीनगरमध्ये तरुणाचा थरारक खू**

तलवारी-कोयत्याने वार करून निर्दय हत्या

करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे विठ्ठल सुभाष शिंदे (वय 24 मुळगाव परभणी )सध्या राहण्यात कोयना वसाहत गांधीनगर या तरुणाचा तलवार आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे.ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. पूर्व वैमन्यातून तरुणाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

कोल्हापूरच्या गांधीनगर भागात शुक्रवारी रात्री विठ्ठल सुभाष शिंदे (वय 24) या तरुणाची तलवार आणि कोयत्याने क्रूर हत्या करण्यात आली. इंदिरानगर झोपडपट्टीतील पाच ते सहा संशयितांनी पूर्व वैमनस्यातून हा थरारक खून केल्याचे उघड झाले आहे. कुमार पान शॉपपासून जीपी ग्रुपपर्यंत चाललेल्या पाठलागात विठ्ठलावर सातत्याने वार करण्यात आले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक जयश्री देसाई आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पाहणी केली.


गांधीनगरमध्ये तरुणाचा थरारक खून
Total Views: 69