बातम्या

वेळ आली आहे पारंपरिक गोष्टी कडे वाटचाल करण्याची...

Time to move on to the traditional


By nisha patil - 3/10/2024 6:16:09 AM
Share This News:



 

 1. वनौषधी चे महत्व आणि उपलब्धता आहे का ? 

                  आधुनिक युगात निसर्गाकडे पाठ फिरविण्याच्या आपल्या साऱ्यांच्या वृत्तीमुळे आपण आपल्याच नैसर्गिक साधन संपत्ती पासुन दुर गेलो. भारत देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. या वनस्पतींचे अनेक औषधी उपयोग आहेत. काही वनौषधी ह्या आपण घरगुतीसुद्धा कुंडीमध्ये लावून जतन करू शकतो. घरगुती वापरातील आलं, हळद, लसूण, धने, माका, कोरफड, ब्राह्मी, गुळवेल, सागरगोटा यासारख्या वनस्पतींची घरगुती लागवड करता येते. पण त्याचे औषधी महत्त्व माहित नसल्याकारणाने आपण त्यांचा उपयोग करू शकत नाही आणि अश्या बहुगुणी वनस्पती आपल्या समोर असताना देखील आपल्याला निरोगी राहण्यासाठी खर्चिक व त्रासदायक मार्ग वापरावा लागत आहे. 
             भारतात अनेक प्रकारच्या वनौषधी आहेत. या वनस्पतींचे औषधी महत्त्व जाणून घ्यायला आपली निसर्गावर नितांत श्रद्धा हवी. परिसरात, शेतात तसेच आपल्या गॅलरीत व गच्चीतही वनौषधींची लागवड करता येते. 

 2. वनौषधीच का? 

                 प्रत्येक मनुष्याला शारीरिक व्याधींना कधीना कधी तोंड द्यावेच लागते. म्हणजेच प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या विकारांना सामोरे जावे लागते. अशावेळी कमी त्रास देणारी औषधे जवळ केली तर आधीच रोगाने ग्रस्त झालेल्या शरीराला एक प्रकारचा दिलासा मिळतो.  म्हणून तर वनौषधी हा सोपा, सरळ, हलका, गुंतागुंत नसलेला उपचार आहे. तस पाहिला गेलं तर आयुर्वेदाचे प्राण वनौषधी विज्ञान असे म्हंटले आहे, होमिओपॅथी ची औषधें हे सुध्दा वनस्पती पासुनच बनतात, म्हणुन प्रत्येकाने वनौषधींबाबत जाणुन घेऊन जागृकता दाखवली आणि त्या दृष्टिने प्रचार-प्रसार केला तर नक्कीच आपण विदेशी कंपन्यांच्या बंधनातून मुक्त होऊ आणि मजबुरीने औषधे न घेता जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच विदेशी औषधे ते ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच...

3. वनौषधीला धन्वंतरींनी ' देवता ' का मानले ?

                 वनौषधींचे सखोल ज्ञान मिळविण्यासाठी प्रत्येकाने निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ गेले पाहिजे. वनौषधी मानवी जीवन आरोग्यपूर्ण करून रोग्याचे दुःख दूर करतो म्हणूनच फार पुरातन काळापासून वनौषधीला धन्वंतरींनी ' देवता ' मानले आहे. आपले जीवन रोगमुक्त तसेच तणावमुक्त करण्यासाठी आपण वनौषधींची मदत घेण्याचा संकल्प करू या. आणि असे केले तरच आपल्याला निसर्गासारखेच ताजेतवाने वाटेल...


वेळ आली आहे पारंपरिक गोष्टी कडे वाटचाल करण्याची...