बातम्या
सीपीआर रुग्णालयात "तंबाखू व्यसनमुक्ती विभाग " सुरू
By nisha patil - 9/25/2024 8:18:35 PM
Share This News:
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात "तंबाखू व्यसनमुक्ती विभाग" सुरू करण्यात आलाय.या तंबाखू व्यसनमुक्ती या मोहिमेच उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांच्या हस्ते मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने झाले.
सीपीआर मध्ये सुरू झालेल्या या विभागांतर्गत तंबाखू व्यसनमुक्ती साठी समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या महाविद्यालयाच्या अंतर्गत मनोविकृतीशास्त्र विभाग हा विभाग सुरू करण्यात आलाय
या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.अनिता सैबन्नावार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शिशिर मिरगुडे, मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.पवन खोत, नोडल ऑफिसर डॉ.विशाल पाटील बालरोगशास्त्र विभागाचे प्राध्यापक विभाग प्रमुख डॉ.सुधीर सरवदे, समाजसेवा अधीक्षक तसेच महाविद्यालय व रुग्णालयकडील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सीपीआर रुग्णालयात "तंबाखू व्यसनमुक्ती विभाग " सुरू
|