बातम्या

आज जागतिक IVF दिवस..

Today is World IVF Day


By nisha patil - 7/25/2024 2:27:52 PM
Share This News:



आज जागतिक IVF दिवस..हा दिवस दरवर्षी 25 जुलै रोजी साजरा केला जातो..
              जगभरात वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, स्त्रिया माता होण्यासाठी विविध तंत्रांचा अवलंब करतात, त्यापैकी IVF सर्वात प्रमुख आहे. आजारपण, शारीरिक स्थिती इत्यादींसह काही समस्यांमुळे गर्भवती होऊ न शकणाऱ्या महिलांसाठी IVF वरदान आहे. जेव्हा जोडपी नैसर्गिकरित्या पालक होऊ शकत नाहीत, तेव्हा IVF सारख्या तंत्राचा अवलंब केला जातो. आईव्हीएफच्या माध्यमातून आई-वडील होण्याचे स्वप्न अनेकजण पूर्ण करत आहेत. याला इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतात. खरं तर, हे तंत्रज्ञान आजकाल खूप सामान्य झाले आहे. परंतु, अजूनही अनेकांना यासंबंधीची संपूर्ण माहिती नाही. त्यामुळे याच्याशी संबंधित अनेक मिथकही लोकांच्या मनात आहेत. बऱ्याच लोकांना असे वाटते की, IVF द्वारे फक्त जुळी मुलंच होतात. त्या ओएसिस फर्टिलिटीच्या संस्थापक आणि वैद्यकीय संचालक आहेत.
   

  IVF बद्दलचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे जुळी मुले किंवा त्यापेक्षा जास्त मुले जन्माला येतात. पण, आता प्रजनन तंत्रज्ञानातील विकासामुळे हे प्रमाण कमी झाले आहे.नैसर्गिकरित्या गर्भधारणेच्या तुलनेत या उपचारामुळे एकापेक्षा जास्त मुलं होण्याची शक्यता वाढवते.
   

 IVF सारख्या पुनरुत्पादक तंत्रज्ञानाद्वारे, जुळे आणि तिळे मुलं होण्याची शक्यता जास्त असते.
     IVF द्वारे सुमारे 30 टक्के गर्भधारणेमुळे एकापेक्षा जास्त मुलं जन्माला येतात.
हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की IVF मध्ये जुळी मुलं असण्याची शक्यता निःसंशयपणे जास्त आहे. पण, तुम्हाला जुळी मुले असतीलच याची शाश्वती नाही.


आज जागतिक IVF दिवस..