बातम्या

आजचा दिवस निश्चितच आश्वासक, भविष्याची नांदी ठरणार आहे-राहुल आवाडे

Today is definitely going to be a promising day


By nisha patil - 10/20/2024 11:50:21 PM
Share This News:



 कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची घोषणा केली असून, पक्षाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर समर्थक, कार्यकर्ते तसेच कुटुंबियांमध्ये  उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, मा.आमदार प्रकाशआण्णा आवाडे, मा. उत्तमअण्णा आवाडे आणि क.अ. जनता बँकेचे चेअरमन मा.स्वप्निल दादा आवाडे यांचे आशिर्वाद घेत मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या इंदुकला निवासस्थानी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या प्रसंगी त्यांनी आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत, आगामी निवडणुकीत पक्षाच्या यशाबाबत आशावाद व्यक्त केला आहे.


आजचा दिवस निश्चितच आश्वासक, भविष्याची नांदी ठरणार आहे-राहुल आवाडे