बातम्या

व्यापाऱ्यांकडे तपासणी दरम्यान प्लास्टिकचा साठा  : चार व्यापाऱ्यांकडून २५ हजार दंड

Traders stockpiling plastic during inspection


By nisha patil - 5/3/2025 3:31:50 PM
Share This News:



व्यापाऱ्यांकडे तपासणी दरम्यान प्लास्टिकचा साठा  : चार व्यापाऱ्यांकडून २५ हजार दंड

महापालिकेच्या वतीने एकल वापर  प्लास्टिक बंदी मोहिम….

 महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात एकल वापर  प्लास्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासक के. मंजुलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवार पेठ व नागाळा पार्क परिसरात एकल वापर प्लास्टिकची तपासणी करण्यात आली. 

व्यापाऱ्यांकडे तपासणी दरम्यान प्लास्टिकचा साठा आढळून आला. यामध्ये समर्थ ट्रेडर्स, साई दुकान व सागर स्वीटस् यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड करून या पथकाने चार व्यापाऱ्यांकडून २५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. महापालिका हद्दीमधील सर्व आस्थापना, व्यापारी व संस्था यांनी एकल वापर प्लास्टिकचा वापर बंद करावा, शहरात एकल वापर प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास आस्थापना, संस्था व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.


व्यापाऱ्यांकडे तपासणी दरम्यान प्लास्टिकचा साठा  : चार व्यापाऱ्यांकडून २५ हजार दंड
Total Views: 36