बातम्या
बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक.
By nisha patil - 3/14/2025 4:00:56 PM
Share This News:
बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक.
कोल्हापुरातील तपोवन मैदान परिसरात बिबट्याचे कातडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या चंदगड येथील बाबू सखाराम डोईफोडे, व तिल्लारीनगर इथल्या धाकलू बाळू शिंदे या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली.त्यांच्या कडून बिबट्याचे कातडे, 40 हजार रुपये किमंतीची मोटारसायकल व 10 हजार रुपये किमंतीचे दोन मोबाईल असा एकूण 50 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दोघा आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलीय.
ही कारवाई कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे पोलिस योगेश गोसावी,वैभव पाटील,गजानन गुरव यांच्यासह पथकाने केली.
बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक.
|