बातम्या

'मिशन रोजगार' अंतर्गत दोनशे प्रशिक्षणार्थीना सौ. पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

Two hundred trainees under  Mission Rozgar


By nisha patil - 10/10/2024 2:50:57 PM
Share This News:



आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या 'मिशन रोजगार' अंतर्गत पीएम विश्वकर्मा योजनेमधून बार्बर, गोल्डस्मिथ व मेसन प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना सौ पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखे नगर कॅम्पस येथे हा कार्यक्रम झाला.

यावेळी बोलताना सौ. पूजा ऋतुराज पाटील म्हणाल्या की मिशन रोजगार या उपक्रमा अंतर्गत  युवक -युवतीना   स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विश्वकर्मा योजनेमधून प्रशिक्षण घेतलेले उमेदवार भविष्यात व्यावसायिक म्हणून पुढे येतील असा विश्वास वाटतो.  

   डी वाय पाटील ग्रुप ने तरुणाईला रोजगार मिळावा यासाठी प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून दिल्याबद्दल  आमदार सतेज पाटील व  आमदार ऋतुराज पाटील  यांच्या विषयी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग साळोखेनगर कॅम्पस चे डायरेक्टर डॉ. अभिजीत माने, विश्वकर्मा योजनेच्या जिल्हा समन्वय शितल गणेशाचार्य, 'मिशन रोजगार' चे समन्वय राजन डांगरे, प्रशिक्षक प्रियांका मोहिते, दिपाली देसाई,यास्मिन मोमिन, समिना जमादार, वैष्णवी कोरडे आदी उपस्थित होते.


'मिशन रोजगार' अंतर्गत दोनशे प्रशिक्षणार्थीना सौ. पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण