बातम्या

दोघा मोटरसायकल चोरट्यांना अटक.

Two motorcycle thieves arrested


By nisha patil - 3/13/2025 4:35:17 PM
Share This News:



दोघा मोटरसायकल चोरट्यांना अटक.

चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त शाहूपुरी पोलिसांची कारवाई.

शाहूपुरी पोलिसांनी दोघा मोटरसायकल चोरट्यांना मोठ्या शिताफीने अटक केलीय. शरद सुभाष टोमके आणि विशाल मधुकर चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे 4 लाख 42 हजार रुपये किमतीच्या एकूण 9 मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात. शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केलीय.

 या प्रकरणी अधिक माहिती अशी की,शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून मोटार सायकल चोरीस गेल्याची फिर्याद सांगली जिल्ह्यातील आष्टा इथल्या महावीर अण्णा आवटी यांनी दिली होती. त्या गुन्हाच्या अनुषंगाने तपास सुरू असता डीबी पथकास सदर चोरीची मोटरसायकल दोघेजण खानविलकर पेट्रोल पंप शेजारी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आष्टा इथला शरद टोमके व बागणी इथल्या विशाल चव्हाण या दोघा आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळ अधिक चौकशी केली असता कासेगाव, आष्टा, करवीर, शिरोली एमआयडीसी, कोल्हापूर, शाहूपुरी पोलीस ठाणे, परिसरातून एकूण नऊ मोटरसायकली चोरी केल्याची  कबूली दोघांनी दिली. दरम्यान या मोटार सायकली जप्त करून सुमारे 4 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची  माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली .
 


दोघा मोटरसायकल चोरट्यांना अटक.
Total Views: 30