बातम्या

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची खा. धनंजय महाडिक यांना सदिच्छा भेट

Union Minister Jyotiraditya Scindia

By nisha patil - 1/27/2025 9:35:45 PM
Share This News:

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची खा. धनंजय महाडिक यांना सदिच्छा भेट

कोल्हापूर: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रविवारी रात्री कोल्हापूर दौऱ्यादरम्यान खासदार धनंजय महाडिक यांची महाडिक फार्मवर सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध राजकीय, विकासात्मक व कौटुंबिक मुद्यांवर सखोल चर्चा झाली.

या भेटीमध्ये महाडिक परिवारातील सदस्यांसोबत कौटुंबिक जिव्हाळा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या भेटीसाठी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, आमदार अमल महाडिक, शोमिका महाडिक आणि अन्य परिवार सदस्य उपस्थित होते. सिंधिया यांच्या या भेटीमुळे महाडिक आणि सिंधिया कुटुंबातील संबंध अधिक दृढ झाले आहेत.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची खा. धनंजय महाडिक यांना सदिच्छा भेट
Total Views: 63