बातम्या
आर्थिक विकासाला चालना देणारा केंद्रीय अर्थसंकल्प: आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 1/2/2025 4:06:32 PM
Share This News:
आर्थिक विकासाला चालना देणारा केंद्रीय अर्थसंकल्प: आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर, दि. १: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२५-२६ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प आरोग्य, कृषि, उद्योग आणि कौशल्य विकासासह विविध क्षेत्रांमध्ये विकासाला चालना देणारा आहे, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
या अर्थसंकल्पात कर्करोगावरील औषधांना करमुक्त करण्यात आले असून, शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडीट कार्डाची मर्यादा ५ लाख रुपये केली आहे. सर्वसामान्य नोकरदारांसाठी करामध्ये सवलत देण्यात आली आहे. स्टार्टअपसाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात येणार आहे. MSME क्षेत्रासाठी १० कोटी रुपयांपर्यंत क्रेडिट गॅरंटी कव्हर वाढवण्यात येईल.
संपूर्ण अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारा आणि शाश्वत विकासाची हमी देणारा असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
आर्थिक विकासाला चालना देणारा केंद्रीय अर्थसंकल्प: आमदार राजेश क्षीरसागर
|