राजकीय
ए वाय पाटील यांना भुदरगडवासियांची एकजुटी, विधानसभेत पाठवण्यासाठी जनतेचा निर्धार
By Administrator - 11/16/2024 3:22:55 PM
Share This News:
ए वाय पाटील यांना भुदरगडवासियांची एकजुटी, विधानसभेत पाठवण्यासाठी जनतेचा निर्धार
कडगांव/प्रतिनिधी – बहुजन आणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या, गेल्या तीस वर्षांपासून समाजकारणातून राजकारण करणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ए वाय पाटील यांना भुदरगडवासियांनी विधानसभेत पाठवण्यासाठी एकजुटीचा संकल्प केला आहे. हे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भुदरगड तालुका अध्यक्ष मायकल डिसोझा यांनी अनफ खुर्द (ता. भुदरगड) येथील कोपरा सभेत केले.
प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी रफिक नाईक होते, तर स्वागत नजीम नाईक यांनी केले. यावेळी अपक्ष उमेदवार ए वाय पाटील यांनी भाषण करताना सांगितले की, “प्रत्येक निवडणुकीत सरड्याचा रंग बदलून गेल्या तीन महिन्यात तीन पक्ष बदलणाऱ्या माजी आमदार व फक्त धनदांडग्यांचा विकास करणाऱ्या आजी आमदारांना मतदारसंघातील जनता खड्यासारखे बाजूला करणार आहे.”
यावेळी कडगाव बाजारपेठेत एक भव्य पदयात्रा काढली गेली. या पदयात्रेत आलिम नाईक, विश्वास पाटील, सोपान सुतार, प्रताप चौगले, अरमान देसाई, सनी परीट, भिकाजी गायकवाड, संतान बारदेस्कर, प्रमोद सिद्रुक, विजय देसाई, संदीप गुरव, सागर गुरव, ज्योती थेडगे, मुनावर नाईक, नासिर नाईक, नारायण तेजम, वसंत देसाई आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सुत्रसंचालन विक्रम केंजळकर यांनी केले, तर आभार दशरथ दिक्षांत यांनी मानले.
वार फिरलय जनतेने ठरवलय
निवडणुकीच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दबावामुळे आता जनतेच्या हातात निवडणुकीची डोरी आहे. ए वाय पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांच्या व कार्यकर्त्यांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. भुदरगड तालुक्यातील वेसर्डे, सावतवाडी, देऊळवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यामध्ये पांडुरंग सुतार, प्रविण जाधव, शाम लिंकर, सौरभ ठाकरे, सुशांत डाकरे, पृथ्वीराज डाकरे, दिलिप सावंत, राजु सावंत, संजय सावंत, अशोक पाटील, मारुती गुरव, संदीप कांबळे, सर्जेराव कांबळे, सचिन कांबळे, आणि इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
ए वाय पाटील यांना भुदरगडवासियांची एकजुटी, विधानसभेत पाठवण्यासाठी जनतेचा निर्धार
|