बातम्या
शिरढोण ग्रामसभेत दारू बंदी वरून गदारोळ
By nisha patil - 1/28/2025 9:53:07 PM
Share This News:
शिरढोण ग्रामसभेत दारू बंदीवरून गदारोळ
शिरढोण, 28 जानेवारी 2025: शिरढोण ग्रामपंचायतीच्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेत दारू बंदीवरून गदारोळ झाला. काही ग्रामस्थांनी गावात राजरोसपणे चालणाऱ्या अवैध दारू विक्रीवर कारवाईची मागणी केली, ज्यावर तणाव निर्माण झाला. ग्रामविकास अधिकारी विनायक शेवरे आणि ग्रामस्थांमध्ये वादविवाद झाला, परंतु बीट अंमलदार विवेक कराडे आणि पोलिस कॉन्स्टेबल पुजारी यांनी हस्तक्षेप केला.
सरपंच सौ शर्मिला टाकवडे यांनी बेकायदेशीर दारू विक्रीवर दंडात्मक कारवाई करून मालमत्ता सील करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. ग्रामसभेत विकासकामांवर चर्चा होणे अपेक्षित असताना, दारू विक्रीवरच जास्त वेळ चर्चा झाली. यावेळी उपसरपंच शिवानंद कोरबू, पोलिस पाटील अनुराधा जाधव आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
शिरढोण ग्रामसभेत दारू बंदी वरून गदारोळ
|