बातम्या

UPSC नंतर आता MPSC मधील दिव्यांग कोटा रडारवर

Upsc,mpsc


By nisha patil - 7/29/2024 2:17:20 PM
Share This News:



UPSC नंतर आता MPSC मधील दिव्यांग कोटा रडारवर

10 पैकी नऊ उमेदवारांची प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तक्रार दखल
    
'यूपीएससी' (UPSC) नंतर आता 'एमपीएससी'च्या (MPSC) पदांमधील दिव्यांग कोट्यात खोटी प्रमाणपत्रे सादर करण्यात आल्याची शंका आहे. त्यामुळे 9 जण जे असे प्रमाणपत्र दाखवून अधिकारी झाले आहेत, ते रडारवर आहेत. या नऊ जणांची आजपासून पुढचे दोन दिवस नव्याने शारीरिक चाचणी होण्याची शक्यता आहे.
    
2022 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या 10 पैकी नऊ उमेदवारांची प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. या सर्व उमेदवारांची शारीरिक तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने एमपीएससीला दिले आहेत. या सर्व उमेदवारांच्या आजपासून पुढचे दोन दिवस नव्याने शारीरिक चाचण्या होण्याची शक्यता आहे. एकूण 623 पदांसाठी परीक्षा झाली होती. यातील 10 जागा दिव्यांगांसाठी राखीव होत्या.
    
दिव्यांग कोट्यातून उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेल्या बुलढाणा येथील एका उमेदवाराचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या या उमेदवाराने  याआधी खेळाडू, अंध आणि इतर कोट्यांचा फायदा घेतला होता. त्यांच्या निवडीवर आक्षेप घेत, त्यांची तक्रार 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगा'चे अध्यक्ष रजनीश शेठ यांच्याकडे करण्यात आली आहे.
            
यासंदर्भात तक्रार करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी  यांच्या कानावरही हा प्रकार घातला आहे. आमदार मिटकरींनी यासंदर्भात सरकार आणि प्रशासकीय पातळीवर यासंदर्भात चर्चा करीत कारवाईची मागणी केलीये.


UPSC नंतर आता MPSC मधील दिव्यांग कोटा रडारवर