बातम्या

लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे?

Use wet socks to reduce fever in children


By nisha patil - 8/10/2024 6:08:02 AM
Share This News:



बऱ्याचदा जास्त ताप आल्यावर ताप कमी व्हावा यासाठी डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या जातात. हा उपाय जवळपास जगभरातील अनेक घरांमध्ये केला जातो. पण, नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लहान मुलांचा आणि प्रौढांचा ताप कमी करण्यासाठी चक्क ‘ओल्या सॉक्सचा’ वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

एका सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटरच्या मते, मुलांना थंड, ओले मोजे घालायला लावावे आणि नंतर त्यांना कोरडे, लोकरीचे मोजे घालावे, यामुळे ताप कमी होण्यास मदत होऊ शकते. “थंड मोजे घातल्याने रक्ताभिसरणाला चालना मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तुमचे शरीर थंड मोजे गरम करण्यासाठी कार्य करत असल्याने ते रक्तप्रवाहास प्रोत्साहन देते आणि नैसर्गिकरित्या ताप कमी करण्यास मदत होते,” असे पोस्टवर लिहिण्यात आले आहे.

या पोस्टनुसार पायात ओले सॉक्स घालण्याचे उपाय...
१. सुरक्षितपणे आणि नैसर्गिकरित्या ताप कमी होतो.
२. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
३. रक्ताभिसरण वाढते.
४. आजारपणात चांगली झोप येण्यास मदत होते.
५. औषधांची गरज भासत नाही.

या युजरने वैज्ञानिक आधारावर सांगितल्याप्रमाणे हा अभ्यास दर्शवितो की, “हायड्रोथेरपी रक्त प्रवाह सुधारून आणि रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित करून ताप प्रभावीपणे नियंत्रित करू शकतो. ही निसर्गोपचाराच्या तत्त्वांमध्ये रुजलेली एक पद्धत आहे, जी शरीराच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेस समर्थन देते.”

त्यांनी त्यात नमूद केले आहे की, तापाच्या औषधांप्रमाणे हा उपाय नैसर्गिक आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. “हे आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोनदेखील प्रोत्साहित करते.”

आणखी काही टिप्स...
या कंटेंट क्रिएटरने पुढे आणखी काही टिप्स दिल्या आहेत, ज्यात लिंबू आणि आल्यासह हर्बल-टीसारख्या इतर काही गोष्टींसह एकत्र करण्याचे सुचवले आणि जर मुलाचे वय एक वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यात मध घालता येईल.

 


लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे?