बातम्या

गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविणार : ना. प्रकाश आबिटकर,ना. हसन मुश्रीफ

Vaccination campaign to prevent cervical cancer


By nisha patil - 1/27/2025 3:35:40 PM
Share This News:



महाराष्ट्रातील मुलीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राज्यभरात राबविणार असल्याची घोषणा पालकमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी शनिवारी केलीय. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने सत्कार आणि लसीकरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिबिरात ५०० मुलींना मोफत लसीकरण करण्यात आलंय. आबिटकर म्हणाले, नवनवीन योजना आणून जनतेला दर्जेदार आणि सक्षम आरोग्य सेवा-सुविधांचा लाभ देण्याचा मानस आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने पुढील धोका ओळखून आधीच मुलींसाठी प्रतिबंध लसीकरण केले आहे. मुश्रीफ म्हणाले, धर्मादाय रुग्णालयांमध्ये १० टक्के गरीब रुग्णांवर उपचार, सीपीआर दुरुस्तीसाठी ५० कोटी, १,१०० कोटी रूपये खर्चुन शेंडा पार्कमध्ये तीन रुग्णालये उभारण्याचे काम सुरू आहे. यावेळी डॉ. शीतल देसाई, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. नूपुर खरे, डॉ. राधिका जोशी उपस्थित होत्या.


गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविणार : ना. प्रकाश आबिटकर,ना. हसन मुश्रीफ
Total Views: 58