राजकीय
वाल्मीक कराडच्या पत्नीचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा
By Administrator - 1/15/2025 3:10:10 PM
Share This News:
बीड : परळीत वाल्मीक कराड यांच्या पत्नीने आज थेट भाष्य करत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. यावेळी त्यांची खदखद स्पष्ट दिसून आली.
तुम्ही सगळे आधी माझ्या घरी खेट्या घालायचात ना, तुम्ही पण येत होतात ना! निवडून यायला तुम्हाला अण्णा लागत होता, मोठा व्हायला अण्णा लागत होता मग आता राजकारण करायला अण्णा नको. माझ्या माणसाचं मरण का करता? तुम्हाला काय राजकारण करायचं ते मुंबईत बसून करा' अशा शब्दात कराड याच्या पत्नीने आपल्या मनातील खदखद माध्यमांसमोर व्यक्त केली.
वाल्मीक कराडच्या पत्नीचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा
|