राजकीय

वंचित बहुजन आघाडीचे ठरलं - पाठिंब्याबाबत भूमिका जाहीर !

Vanchit Bahujan Aghadi has become


By nisha patil - 11/22/2024 9:55:27 PM
Share This News:



राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काल उत्साही वातावरणात मतदान झालं. त्यानंतर राज्यात सत्ता कोणाची येणार याबाबत एक्झिट पोल नुसार अंदाज वर्तविण्यात आलेत. त्यानुसार राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही. अपक्ष छोट्या पक्षांचा आधार घ्यावा लागणार असल्याचे चित्र स्पष्ट होतय.

त्यात आता निवडणूक निकाला आधीच आश्चर्यकारकरीत्या वंचित बहुजन आघाडीने आपला पाठिंबा कोणाला ते जाहीर केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पक्षाची भूमिका स्पष्ट केलीय.

" जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ.आम्ही सत्ता निवडू! आम्ही सत्तेत राहायला निवडू! असे प्रकाश आंबेडकर यांनी एक्स पोस्टवर सांगितल आहे.

त्यामुळे महायुती सत्ता बनवू किंवा महाविकास आघाडी दोघांच्याकडेही वंचित जाईल हे स्पष्ट होतय.


वंचित बहुजन आघाडीचे ठरलं - पाठिंब्याबाबत भूमिका जाहीर !