बातम्या

ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं निधन

Veteran actress Smriti Biswas passed away


By nisha patil - 4/7/2024 8:09:31 PM
Share This News:



ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांनी वयोमानाच्या त्रासामुळे बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांनी हिंदी, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं. फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही दु:खद बातमी दिली असून गुरुवारी ख्रिश्चन पद्धतीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  स्मृती विश्वास यांचं महाराष्ट्रातील नाशिकमध्ये त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. अभिनेत्री स्मृती विश्वास यांनी 1930 च्या दशकात फिल्मी कारकि‍र्दीला सुरुवात केली. 1930 ते 1960 पर्यंतच्या तीन दशकांमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आणि महत्त्वपूर्ण योगदान दिलं.स्मृती विश्वास यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये 100 वा वाढदिवस साजरा केला होता.


ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं निधन