बातम्या
ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांचे निधन
By nisha patil - 1/27/2025 5:11:12 PM
Share This News:
ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांचे निधन
कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार दिलावरखान आयुबखान मुन्सी पालकर उर्फ नाना पालकर (वय 78) यांचे आज, 27 जानेवारी रोजी निधन झाले. शनिवारी हृदयविकाराचा झटका आणि मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
नाना पालकर यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य केले. त्यांनी साप्ताहिक तडजोड चालवले आणि विविध दैनिकांतून पत्रकारिता केली. ते प्रेस क्लब ऑफ इंडियाचे सदस्य होते आणि महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 5 वाजता निघेल.
ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांचे निधन
|