बातम्या

समर्पित भावनेने केलेल्या कामामुळे विजय निश्चित

Victory is assured by dedicated work


By nisha patil - 10/19/2024 10:12:54 PM
Share This News:



गेल्या ३० ते ३५ वर्षांच्या सामाजिक व राजकीय जीवनामध्ये आपण नेहमी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून समर्पित भावनेने काम केले आहे. त्यामुळे सर्वांच्या पाठबळावर येत्या विधानसभा निवडणुकीत सहाव्यांदा माझा विजय निश्चित आहे. असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी  केले. गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ, बेळगुंदी, इंचनाळ व ऐनापुर येथे संपर्क बैठकित ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील - गिजवणेकर म्हणाले, या मतदारसंघात स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी विकासाचा पाया घातला होता. त्यावर कळस चढवण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी अविरतपणे केले आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी विकास कामांसाठी प्रचंड निधी उपलब्ध करून या परिसराचा कायापालट केला आहे.

दरम्यान अत्याळ येथे ज्येष्ठ नेते एस. आर. पाटील, माजी सरपंच शालन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.बेळगुंदी येथे सरपंच शामला प्रभाकर सोनवक्के, मिलिंद मगदूम, तानाजी लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तिन्ही गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


समर्पित भावनेने केलेल्या कामामुळे विजय निश्चित