विशेष बातम्या

"विक्रम केंजळेकर यांची भुदरगड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या सचिवपदी निवड!"

Vikram Kenjlekar elected as Secretary


By nisha patil - 12/2/2025 6:40:26 PM
Share This News:



भुदरगड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा

गारगोटी (प्रतिनिधी): भुदरगड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड आज गारगोटी येथील भुदरगड टाईम्स कार्यालयात संपन्न झाली. ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सुभाष माने यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या.

संघटनेच्या अध्यक्षपदी सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र आणि सह्याद्री धुरळा चे मुख्य संपादक नितीन बोटे यांची निवड करण्यात आली. महिला तालुका अध्यक्षपदी सौ. सविता सुभाष माने (भुदरगड टाईम्स) यांची निवड झाली. तसेच गारगोटी शहर अध्यक्षपदी सौ. तन्वी नितीन बोटे, महिला उपाध्यक्षपदी सौ. स्वाती रमेश नांदुलकर, तर विक्रम केंजळकर (तारा न्यूज) यांची तालुका सचिवपदी निवड करण्यात आली.

यावेळी संघटनेच्या राज्य अधिवेशनासाठी मोठ्या प्रमाणावर पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सहदेव साळोखे (तालुका सरचिटणीस), हरिश्चंद्र देसाई (तालुका उपाध्यक्ष), ओमकार चौगुले (सह्याद्री धुरळा), रमेश नांदुलकर (सह्याद्री धुरळा), शशिकांत पाटील (लाईव्ह महाराष्ट्र नाईन), अजित यादव (नवराष्ट्र), प्रकाश खतकर (प्रकाश न्यूज) आदी पत्रकार उपस्थित होते.


"विक्रम केंजळेकर यांची भुदरगड तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या सचिवपदी निवड!"
Total Views: 52