बातम्या

ससेगांव (ता. शाहूवाडी) येथे ३५ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

Vinay kore


By nisha patil - 9/30/2024 11:38:56 PM
Share This News:



ससेगांव येथे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ३५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यामध्ये १ शाळा खोली बांधण्यासाठी १० लाख, गोसावी समाजासाठी सामाजिक सभागृहासाठी १५ लाख, आणि हरिजन वस्तीमध्ये सामाजिक सभागृहासाठी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

उपस्थित मान्यवर

 

कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील, शाहूवाडी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे, ससेगांव सरपंच सुनंदा पाटील, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

उपस्थित कार्यकर्त्यांची यादी

 

तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक पारळे, ज्ञानदेव पारळे, कुमार पारळे, प्रकाश पारळे, प्रविण सोने, आनंदा पारळे, परशुराम पारळे, वसंत पारळे, शशिकांत पाटील, बबन कांबळे, विष्णू पारळे, जीवन पारळे, संपत गोसावी, उत्तम गोसावी, लक्ष्मण गोसावी, दशरथ गोसावी, सुरेश गोसावी, सुरज गोसावी, विश्वजित गोसावी, यशवंत गोसावी, तानाजी गोसावी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 


ससेगांव (ता. शाहूवाडी) येथे ३५ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन