बातम्या

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर: बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशिद यांच्या नावांवर

Vinay korea


By nisha patil - 12/10/2024 11:20:14 PM
Share This News:



शाहूवाडी तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला बाजी प्रभू देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व पन्हाळा तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शिवा काशिद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे दोन्ही संस्थेचे नामांतर झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी महाराष्ट्र शासनाचे मनःपुर्वक आभार मानले...

 

*शाहूवाडी व पन्हाळा या दोन्ही तालुक्यांना वीर बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशीद यांच्यामुळे जाज्वल्य ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. त्याअनुशंगाने बाजी प्रभू देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,शाहूवाडी व शिवा काशिद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पन्हाळा अशी नावे देण्यात यावीत याबाबत शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी १ ऑक्टोबर रोजी शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता...*

त्यानुसार महाराष्ट्र शासनाने दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी शासकीय औद्योगिक संस्थांची नावे बदलण्यास मान्यता देत असलेबाबत शासन निर्णय जाहीर केला असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी सांगितले....*


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामांतर: बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशिद यांच्या नावांवर