बातम्या
विनेश फोगाटचा संघर्ष संपता संपेना ...
By nisha patil - 7/8/2024 2:48:20 PM
Share This News:
काही महिन्यांपूर्वी भारतीय कुस्ती संघटनेच्या माजी अध्यक्षांविरुद्ध लैंगिक शोषणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या विनेश फोगाट हिने मंगळवारी पहिल्या लढतीपासूनच धडाकेबाज कामगिरी केली. पहिल्या दोन ऑलिंपिकमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या विनेश हिने पॅरिसमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.उपांत्य फेरीच्या लढतीत तिने लढत संपायला काही सेंकद बाकी असताना गुजमान हिचा एक पाय पकडून तिच्यावर पकड मिळवली. त्यानंतर तिने महत्त्वाचे गुण मिळवत अगदी दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.
मात्र, पॅरिस ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी कुस्तीपटू विनेश फोगाट स्पर्धेतून अपात्र ठरली आहे. विनेशनं महिलांच्या 50 किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात विनेशनं क्युबाच्या युस्नेलिस लोपेझ गझमनवर मात केली होती.मात्र, बुधवारी (7 ऑगस्ट) सकाळी विनेशचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आलं आहे.स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धकाचं वजन दोन्ही दिवशी त्यांच्या वजनश्रेणीतच असणं आवश्यक असतं.
विनेश फोगाटचा संघर्ष संपता संपेना ...
|