बातम्या
अबू आझमी यांच्या विरोधात कोल्हापुरात उग्र निदर्शने
By nisha patil - 5/3/2025 3:41:28 PM
Share This News:
अबू आझमी यांच्या विरोधात कोल्हापुरात उग्र निदर्शने
औरंगजेबाच्या समर्थनार्थ वक्तव्य करणाऱ्या अबू आझमी यांचा आज कोल्हापुरात सकल हिंदू समाज तर्फे तीव्र निषेध करण्यात आला. आज सकाळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत उग्र निदर्शने केलीत.यावेळी अबू आजमींच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत पुतळ्याचे दहन करण्यात आले.
दरम्यान अबू आझमी यांनी "औरंगजेबाच्या राजवटीत सुवर्णकाळ होता" असे वक्तव्य केले होते. "औरंगजेबाने अनेक मंदिरे बांधली आणि बनारसच्या पंडितांना मुलींशिवाय लग्न करण्याची परवानगी दिली" असे दिशाभूल करणारे वक्तव्य करून हिंदू समाजाच्या इतिहासाचा अपमान केला असल्याचे आंदोलकांनी यावेळी म्हंटले आहे..
अबू आझमी यांच्या विरोधात कोल्हापुरात उग्र निदर्शने
|