बातम्या
विशाल पाटलांचे मोठे वक्तव्य: “सांगली महापालिका स्वतंत्र लढेल”
By nisha patil - 1/14/2025 6:32:11 PM
Share This News:
विशाल पाटलांचे मोठे वक्तव्य: “सांगली महापालिका स्वतंत्र लढेल”
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, “स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना ओळखूनच आघाड्यांचे निर्णय घ्यावे लागतील. इंडिया आघाडी दिल्लीत तयार झाली असली तरी स्थानिक पातळीवरील महापालिका निवडणुकीत आघाडी होईलच असे नाही. काही वेळा सांगली महापालिकेसाठी स्वतंत्र लढाईचा निर्णय घ्यावा लागेल.
विशाल पाटील यांनी विधानसभेतील पराभवावरही भाष्य करताना सांगितले की, “हा पराभव संपूर्ण पक्षासाठी संयुक्तीक आहे. त्यामुळे आता पुरोगामी महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे.”
विशाल पाटील यांच्या या वक्तव्यामुळे सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.
विशाल पाटलांचे मोठे वक्तव्य: “सांगली महापालिका स्वतंत्र लढेल”
|